Photo – ऑफशोल्डर मरमेड ड्रेसमध्ये माधुरी दीक्षितच्या कातिलाना अदा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बॉलिवूडची ‘धकधक गर्ल’ अभिनेत्री माधुरी दीक्षित आजही आपल्या सौंदर्याने आणि नृत्याने लाखो दिलांवर राज्य करत आहे. वयाची पन्नाशी ओलांडली असली तरी तिची फिटनेस आणि मोहकता आजही तितकीच कायम आहे. माधुरी सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असून ती आपल्या आयुष्यातील खास क्षण आणि ग्लॅमरस फोटो सतत चाहत्यांसोबत शेअर करत असते. नुकतेच तिने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर काही नवीन फोटो पोस्ट केले आहेत, जे सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. या नवीन फोटोंमध्ये माधुरी एका सुंदर ऑफशोल्डर मरमेड ड्रेसमध्ये दिसत आहे. या खास लूकसाठी तिने अत्यंत सोबर मेकअपची निवड केली असून तिचे मोकळे केस तिच्या सौंदर्यात अधिकच भर घालत आहेत. या ड्रेसमध्ये तिने दिलेल्या वेगवेगळ्या किलर पोज चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहेत. माधुरीचा हा नवा अवतार पाहून तिचे चाहते पुन्हा एकदा तिच्या प्रेमात पडले असून, नेटिझन्सकडून तिच्या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे. या फोटोंमधून तिने पुन्हा एकदा सिद्ध केले आहे की, सौंदर्यासाठी वय हा केवळ एक आकडा असतो.