शेअर बाजार धडाम! सेन्सेक्स 1342 अंकांनी, निफ्टी 395 अंकांनी घसरले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुस्थानी शेअर बाजारात बुधवारी मोठी घसरण झाली. हिंदुस्थानी शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्समध्ये 1342 अंकांची घसरण झाली. त्यामुळे सेन्सेक्स पहिल्यांदाच या वर्षी 76,863 अंकांपर्यंत खाली घसरला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 395 अंकांनी घसरून 23,866 अंकांवर बंद झाला. या जबरदस्त घसरणीचा फटका बसल्याने गुंतवणूकदारांना तब्बल सहा लाख कोटी रुपयांचा फटका बसला आहे.

मध्य पूर्वेत सुरू असलेल्या युद्धामुळे गुंतवणूकदारांची चिंता वाढली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी युद्ध संपवण्याचे संकेत दिले होते, परंतु इराण इरेला पेटला असून युद्ध कधी थांबवायचे हे आम्ही ठरवणार, असे सांगितल्याने युद्ध लांबणार असल्याचे दिसत आहे. विदेशी गुंतवणूकदारांनी युद्धाचा धसका घेतला असून शेअर विक्रीवर भर दिला आहे. विदेशी गुंतवणूकदारांनी अवघ्या एका दिवसात 4 हजार 673 कोटी रुपयांचे शेअर्स विकले आहेत. मार्चमध्ये विदेशी गुंतवणूकदारांनी हिंदुस्थानी शेअर बाजारातून जवळपास 32,849 कोटी रुपये काढले आहेत. मंगळवारी शेअर बाजार 78,260 तर निफ्टी 24,261 अंकावर बंद झाला. या वाढीमुळे गुंतवणूकदारांनी नफेखोरी केल्याने अनेक पंपन्यांचे शेअर्स घसरले आहेत. ऑटो, फायनान्शियल सर्विसेज, आयटी आणि एफएमसीजी सेक्टरच्या शेअर्समध्ये घसरण झाली.