

इस्रायल-अमेरिका आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या संघर्षामुळे इराणचं जनजीवन प्रचंड विस्कळीत झालेलं आहे.

अमेरिका आणि इस्रायलने एकत्र येत 28 फेब्रुवारी रोजी इराणवर पहिला हल्ला केला होता.

या हल्ल्यामध्ये इराणची राजधानी तेहरान आणि तसेच देशभरातील महत्त्वाच्या पायाभूत सुविधा, लष्करी स्थळे आणि नेत्यांनाही निशाणा साधण्यात आला.

अमेरिका आणि इस्रायलच्या हल्ल्यामध्ये 1989 पासून इराणचे नेतृत्व करणारे इराणचे तत्कालीन सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी हे यामध्ये मारले गेले आहेत.

या हल्ल्यांमध्ये इराणमधील महत्त्वाच्या इमारतींचंही प्रचंड नुकसान झालेलं आहे.

28 फेब्रुवारीपासून सुरू झालेल्या अमेरिका-इस्रायलच्या हल्ल्यांनंतर इराणची राजधानी तेहराणच्या आजूबाजूच्या किमान 4 तेल प्रकल्पांवर हल्ले झाले आहे.

स्थानिकांच्या मते, शहरातील काही भागात धूर आणि प्रदूषण इतकं वाढलं आहे की सूर्यही दिसत नाही आणि जळण्याचा तीव्र वास येत आहे.

हवेत प्रदूषण करणारे घटक मोठ्याप्रमाणात वाढले आहे.




























































