
इराण हिंदुस्थानच्या जहाजांना होर्मुझच्या सामुद्रधुनीतून मार्ग देईल, असे इराणचे राजदूत म्हणाले होते. त्यानंतर ‘शिवालिक’ आणि ‘नंदा देवी’ या दोन एलपीजीवाहू जहाजांना इराणने मार्ग दिला असून आज त्यांनी सामुद्रधुनी पार केली. 92,700 टन एलपीजी घेऊन हिंदुस्थानकडे निघालेली ही जहाजे दोन-तीन दिवसांमध्ये मुंद्रा आणि कांडला पोर्ट येथे पोहोचतील.



























































