सासरच्या जाचाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सासरच्या लोकांकडून होत असलेल्या छळासह पैशांच्या मागणीला कंटाळून विवाहितेने लग्नानंतर अवघ्या आठ महिन्यांत गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. ही घटना लोणीकंद परिसरात घडली आहे. याप्रकरणी पती, सासू-सासऱ्यांविरोधात लोणीकंद पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. वैष्णवी जामकर असे आत्महत्या केलेल्या नवविवाहितेचे नाव आहे. दरम्यान, वर्षभरापूर्वी वैष्णवी हगवणे हिने सासरच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना घडली होती. त्यानंतर अशा प्रवृत्तीविद्धद्ध संपूर्ण राज्यभरात संतापाची लाट उसळल्याचे दिसून आले होते. या घटनेने महिलांच्या कौटुंबिक सुरक्षेबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.