अटकेची भीती दाखवून ज्योतिषाला लावला चुना

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अश्लील व्हिडीओ पाहत असल्याचे भासवत डिजिटल अटकेच्या नावाखाली ठगाने ज्योतिषाला चुना लावल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी अँटॉप हिल पोलिसांनी गुन्हा नोंद करून तपास सुरू केला आहे. तक्रारदार हे ज्योतिषी असून सायन कोळीवाडा परिसरात राहतात. दोन दिवसांपूर्वी ते जीटीबी रेल्वे स्थानकातून चालत येत होते. तेव्हा त्यांना व्हॉट्सअ‍ॅपवर एक व्हिडीओ कॉल आला.