
वाहतुकीच्या किरकोळ वादातून तरुणाची हत्या झाल्याची घटना मालाड येथे घडली. शारिक अन्सारी असे मृताचे नाव आहे. या प्रकरणी बांगूर नगर पोलिसांनी गुन्हा नोंद करून सत्येंद्र गुप्ता आणि सुनील पाल या दोघांना अटक केली. शारिक हा मालवणी येथे राहत होता. त्याची एक कंपनी होती. शनिवारी सकाळी तो घरातून मोटारसायकलवरून निघाला. दुपारी तो इन्फिनिटी मॉल परिसरात आला. तेव्हा त्याचा वाहतुकीच्या कारणावरून कारचालक सत्येंद्रशी वाद झाला. या वादातून त्याने सत्येंद्रला शिवीगाळ करून बेदम मारहाण केली. त्यानंतर त्याच्याकडील घातक शस्त्राने त्याच्यावर हल्ला केला. दोन्ही आरोपींना न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे.



























































