असं झालं तर… बँकेतून धनादेश परत आला…

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

धनादेश परत आल्यास (बाऊन्स झाल्यास) घाबरून न जाता, बँकेकडून ‘रिटर्न मेमो’ घ्या. अपुरा निधी, सही जुळत नाही, नेमके काय कारण आहे ते जाणू घ्या.

पैसे देणाऱ्याशी संपर्क साधा. थेट त्या व्यक्तीला फोन करून किंवा भेटून समस्येबद्दल विचारा आणि पैसे देण्यास सांगा, ही चूक नकळत झाली असू शकते.

जर समोरची व्यक्ती टाळाटाळ करत असेल, तर कायदेशीर मार्ग स्वीकारा. संबंधित व्यक्तीला 15 दिवसांच्या आत वकिलामार्फत कायदेशीर नोटीस पाठवा.

नोटीस पाठवल्यानंतरही पैसे न मिळाल्यास 30 दिवसांनंतर तुम्ही कलम 138 अंतर्गत चेक बाऊन्सचा खटला दाखल करू शकता.

चेक बाऊन्स झाल्यापासून 30 दिवसांच्या आत कायदेशीर नोटीस पाठवणे आवश्यक आहे. पुन्हा चेक न स्वीकारता, रोख, डीडी किंवा ऑनलाइन ट्रान्सफरने पैसे घ्या