
रश्मिका आणि विजय देवरकोंडा यांचे नुकतेच लग्न झाले आहे. लग्नापूर्वी या दोघांनी विविध गाजलेल्या चित्रपटांमध्ये एकत्र काम केले. त्यातील एक चित्रपट म्हणजे ‘डिअर कॉम्रेड’. या चित्रपटात विजय देवरकोंडा सोबत काम करु नको असे घरच्यांनी तिला बजावले होते. परंतु तरीही रश्मिकाने मात्र घरच्यांचे ऐकले नाही.
दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतून बॉलिवूडपर्यंत आपली वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या रश्मिका मंदाना हिने करिअरच्या सुरुवातीलाच एक मोठा आणि धाडसी निर्णय घेतला होता. तिच्या दुसऱ्या चित्रपटासाठी तिला घरच्यांच्या विरोधाला सामोरे जावे लागले होते. NDTVच्या रिपोर्टनुसार, डिअर कॉम्रेड या चित्रपटासाठी रश्मिकाने विजय देवरकोंडा सोबत काम करण्याचा निर्णय घेतला. मात्र, तिच्या कुटुंबाला हा निर्णय मान्य नव्हता.
रश्मिकाच्या कुटुंबाला फिल्म इंडस्ट्रीबाबत अनेक शंका होत्या. विशेषतः मुलींसाठी हे क्षेत्र सुरक्षित नाही, अशी त्यांची भावना होती. त्यामुळे त्यांनी तिला हा चित्रपट करू नये, असा सल्ला दिला. एका कार्यक्रमात बोलताना रश्मिकाने सांगितले की, या चित्रपटासाठी तिला कुटुंबाला पटवण्यासाठी खूप संघर्ष करावा लागला होता. घरात यावरून मोठे वादही झाले असल्याचे तिने सांगितले. तरीही तिने आपला निर्णय बदलला नाही. मला हा चित्रपट करायचाच होता, असे ठामपणे सांगत तिने स्वतःच्या करिअरला प्राधान्य दिले. डिअर कॉम्रेड हा रोमँटिक-ड्रामा चित्रपट प्रेक्षकांना खूप आवडला. रश्मिका आणि विजय देवरकोंडा यांची जोडी विशेष गाजली होती.



























































