
n आयुर्वेदानुसार श्रीखंड हे ‘सात्त्विक’ अन्न मानले जाते. योग्य प्रमाणात आणि योग्य वेळी खाल्ले तर हे शरीराला थंडावा देते, पचन सुधारते आणि ऊर्जा देते.
n दही तयार करण्याआधी ते हलके थंड करून घेतले की ते घट्ट राहते. त्यानंतर चक्का तयार करण्यासाठी पांढऱ्या रंगाचा मऊ कपडा वापरावा. चक्का जास्त वेळ टांगून ठेवल्यास दही थोडे आंबट होऊ शकते.
n श्रीखंड बनवताना नेहमी ताजे दही वापरावे. जास्त जोरात ढवळल्यास किंवा थेट मिक्सरमध्ये पेस्ट केल्यास भांडय़ाच्या उष्णतेमुळे श्रीखंड पातळ होऊ शकते.






























































