
सब्जा सीड्स ज्याला तुळशीच्या बिया किंवा फालुदा बिया असेही म्हणतात. सब्जा सीड्स पोषक तत्वांनी समृद्ध असून प्रामुख्याने शरीराला थंडावा देण्यासाठी, पचनक्रिया सुधारण्यासाठी आणि वजन कमी करण्यासाठी उत्तम मानले जाते. यात फायबर, ओमेगा-३ फॅटी ऍसिडस्, आणि अनेक जीवनसत्त्वे असतात. सब्जा खाल्ल्याने शरीराला कोणते आरोग्य फायदे होतात जाणुन घ्या.
शरीराचे तापमान टिकवून ठेवण्यास मदत
सब्जाच्या बियांवर असलेल्या बुळबुळीत जेलसारखे आवरणात पाण्यात भिजवल्यावर त्यांमध्ये नैसर्गिक शीतलता देणारे गुणधर्म येतात. हा बुळबुळीत पदार्थ शरीरातील ओलावा शोषून घेतो आणि त्वचेला आर्द्रता प्रदान करतो. यामुळे शरीरातीत तापमान टिकवून ठेवण्यास मदत होते.
शरीराला हायड्रेट ठेवते
सब्जाच्या बियांमध्ये पाणी शोषुन घेण्याची क्षमता जास्त असते. पाण्यात भिजवलेला सब्जा खाल्याने शरीराला हायड्रेट करण्यास मदत होते. तसेच भिजवलेला सब्जा लिंबू सरबत व नारळाचे पाणी यांसारख्या पेयांनमध्ये घातल्यावर या पेयांची चव आणखी वाढवते.
पचनास मदत करते
सब्जाच्या बियांमध्ये डायटरी फायबर असते. ज्यामुळे आतड्यांचे आरोग्य सुधारते, पोट फुगणे कमी होते आणि तीव्र उष्णतेशी संबंधित समस्यांमध्ये देखील सब्जाची मदत होते.
वजन नियंत्रित ठेवण्यस मदत होते
सब्जाच्या बियांमध्ये भरपूर फायबर असल्यामुळे त्या तुमचे वजन नियंत्रित ठेवण्यास मदत करू शकतात. यामुळे पोट जास्त वेळ भरल्यासारखे वाटते.
आम्लपित्त कमी करण्यास मदत होते
सब्जाच्या बियांचा थंड स्वभाव पोटातील आम्ल कमी करण्यास मदत करतो. त्यामुळे उन्हाळ्यात त्या प्रभावी ठरतात. सब्जाचे पाणी पिल्याने शरीरातील आम्लपित्त आणि छातीत जळजळ कमी करण्यास मदत करतात.
रक्तातील साखरेची पातळी सुधारते
सब्जाच्या बिया खाल्याने शरीरात कर्बोदकांचे ग्लुकोजमध्ये होणारे रूपांतर मंदावते. ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी स्थिर राहण्यास मदत होते.
त्वचेच्या आरोग्यासाठी मदत करते
सब्जाच्या बियांमध्ये डिटॉक्सिफायिंग गुणधर्म आणि अँटीऑक्सिडंट्स असतात. जे त्वचेच्या पेशी दुरुस्त करण्यास आणि त्वचेला स्वच्छ व चमक देण्यास मदत करतात.



























































