
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा गुढीपाडवा मेळावा उद्या सायंकाळी 5 वाजता दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज पार्क मैदानावर होणार आहे. या मेळाव्याला मनसे अध्यक्ष राज ठाकरे संबोधित करणार आहेत.
मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यासाठी भव्य व्यासपीठ उभारण्यात आले आहे. मोठे एलईडी स्क्रीनही लावण्यात आले आहेत. ‘महाराष्ट्र धर्माची गुढी उभारण्यासाठी, चला भेटूया शिवतीर्थावर’ असे आवाहन या मेळाव्यानिमित्त करण्यात आले आहे.
या मेळाव्यासाठी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात येणार असून, वाहतूककोंडी होऊ नये म्हणून पोलिसांच्या वाहतूक शाखेकडून व्यवस्थापन करण्यात आले आहे.
































































