
प्रदूषणकारी दुचाकी, चारचाकी वाहनांवर आता दुप्पट पर्यावरण कर लावण्यात येणार आहे. याबाबत ‘महाराष्ट्र मोटार वाहन कर (अधिनियम) 2026’ विधेयक विधान परिषदेत आज मंजूर करण्यात आले. या निर्णयामुळे सरकारच्या तिजोरीत तब्बल 160 कोटी रुपयांचा महसूल जमा होणार आहे.
दुचाकी वाहनांसाठी पर्यावरण कर यापूर्वी 2 हजार रुपये होता. तो आता 4 हजार रुपये आकारला जाईल. तर चारचाकी पेट्रोल वाहनांसाठी 3 हजारांवरून 6 हजार रुपये आणि डिझेल वाहनांसाठी 3 हजार 500 वरून 7 हजार रुपये इतका असेल असे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले.
पीयूसी नाही तर पेट्रोल-डिझेल नाही
यापुढे नव्या उपाययोजनेद्वारे वाहनचालकांकडे पीयूसी नसेल तर त्यांना पेट्रोल-डिझेल मिळणार नाही. तसेच लवकरच याकरिता सॉफ्टवेअर प्रणाली विकसित करून जीओटॅगिंग आणि जीपीएस प्रणालीचा समावेश करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.






























































