
नाशिकचा भोंदू अशोक खरात याने महिलांचे लैंगिक शोषण केल्याचे प्रकरण गाजत असतानाच आता माजी शिक्षणमंत्री दीपक केसरकर आणि ऊोंदू अशोक खरात यांचे संबंध असल्याचे उघड झाले आहे. याबाबत शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी मोठा दावा केला आहे.
संजय राऊत यांनी एक्सवर पोस्ट केली आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, केसरकर शिक्षण मंत्री असताना शिक्षण खात्यातील सर्व बदल्या आणि बढत्या याच खरात बाबाच्या शिफारशीने होत असत. त्या कामी बाबा अनेकदा नरिमन पॉइंट ट्रायडेंट मध्ये मुक्कामास असत! असे त्यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे. त्यामुळे खळबळ उडाली आहे.
केसरकर शिक्षण मंत्री असताना
शिक्षण खात्यातील सर्व बदल्या आणि बढत्या याच खरात बाबाच्या शिफारशीने होत असत
त्या कामी बाबा अनेकदा नरिमन पॉइंट ट्रायडेंट मध्ये मुक्कामास असत!(wait and watch) https://t.co/JF7ap23D4a
— Sanjay Raut (@rautsanjay61) March 20, 2026
या भोंदू बाबाने जी माहिती पोलिसांना दिली ती अत्यंत गोपनीय जरी असली तरी महाराष्ट्राच्या सध्याच्या मंत्रिमंडळातले नऊ मंत्री हे या भोंदू बाबाचे नियमित भक्त होते आणि त्यांच्याकडे जाऊन रेग्युलर काही अत्यंत घृणास्पद प्रकारचे विधी करत होते. अंधश्रद्धा आहे, त्याहीपेक्षा महाराष्ट्राच्या प्रतिमेला कलंक करणारे हे प्रकरण आहे, असेही त्यांनी सांगितले.

























































