
इंडियन प्रीमियर लीगचा 19 वा हंगाम 28 मार्चपासून सुरू होत आहे. सलामीचा सामना गतविजेच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि कोलकाता नाईट रायडर्स संघात रंगणार आहे. ही स्पर्धा सुरू होण्यास अवघे काही दिवस बाकी असतानाच कोलकाताचा मेंटर आणि वेस्ट इंडिजचा माजी कर्णधारल ड्वेन ब्रावो एका विचित्र वादामध्ये अडकला आहे. एका कार्यक्रमात बोलताना माईक सुरू राहिला आणि ब्रावोच्या तोंडातून गुपित बाहेर पडले. याची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे.
आयपीएलच्या नव्या हंगामापूर्वी कोलकाता नाईट रायडर्सने एका कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाला केकेआरचे मुख्य प्रशिक्षक अभिषेक नायर, साहाय्यक प्रशिक्षक शेन वॉटसन, कर्णधार अजिंक्य रहाणे आणि मेंटर ड्वेन ब्रावो उपस्थित होता. या कार्यक्रमात अनवधानाने ब्रावोचा माईक ऑन राहिला आणि त्यांची एक खासगी चर्चा रेकॉर्ड झाली.
जेव्हा या लोकांनी मला फोन केला, तेव्हा माझ्या घरी दोन मुली होत्या… असे ड्वेन ब्रावो म्हणाला. तो पुढे आणखी काही बोलणार इतक्यात बाजूला बसलेल्या अजिंक्य रहाणेने त्याला माईक ऑन असल्याचा इशारा केला. इशारा मिळताच ब्रावोने तात्काळ ओह शट.. म्हणत आपली चूक झाल्याचे मान्य केले. मात्र तोपर्यंत त्याचे हे विधान माईकमध्ये रेकॉर्ड झाले होते.
🚨BRAVO & RAHANE AWKARD MOMENT.🚨
– KKR full management was attending a press conference including their coach and captain.
– Bravo didn’t know Mics were on
– Bravo 🗣️ : ” I had 2 chicks(Girls) in my house”🤯
– Rahane 🗣️ : “Mics are on,be careful not to talk like this”😡
— Indian Cricket (@IPL2025Auction) March 20, 2026
दरम्यान, ब्रावोचे हे विधान सोशल मीडियावर वाऱ्यासारखे व्हायरल झाले असून नेटकऱ्यांनी त्याच्यावर टीकेची झोड उठवली आहे. अनेकांनी हे विधान महिलांचा अपमान करणारे आणि बेजबाबदार असल्याचे म्हटले आहे. ड्वेन ब्रावो ज्या दोन मुलींबद्दल बोलत होता त्या नक्की कोण होत्या हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, या एका क्लिपमुळे केकेआरच्या प्रतिमेला धक्का पोहोचल्याची चर्चा रंगली आहे.
हार्दिक पंड्याच्या वादाची आठवण
दरम्यान, या घटनेमुळे क्रिकेट चाहत्यांना हार्दिक पंड्याच्या कॉफी विथ करण याा शो मधील वादग्रस्त विधानाची आठवण झाली आहे. त्यावेळी हार्दिकला देखील मोठ्या टीकेला सामोरे जावे लागले होते आणि त्याला सार्वजनिक माफी मागावी लागली होती. आता ड्वेन ब्रावो या प्रकरणावर काय स्पष्टीकरण देतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.



























































