
अभिनेत्री रश्मिका मंदानाला ‘तेलंगणा गदर फिल्म अवॉर्डस् 2025’ मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. रश्मिका मंदानाला तिच्या ‘द गर्लफ्रेंड’ चित्रपटातील ‘भूमा देवी’ या भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून निवडण्यात आले. अभिनेता राम चरणने मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांच्या उपस्थितीत रश्मिकाला ही ट्रॉफी दिली. लग्नानंतर रश्मिकाचा हा पहिला मोठा पुरस्कार आहे.


























































