आयएनएस तारागिरी येतेय!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुस्थानी नौदलाची ताकद आणि क्षमता आणखी वाढणार आहे. स्वदेशी तंत्रज्ञान वापरून तयार करण्यात आलेली आधुनिक स्टेल्थ फ्रिगेट आयएनएस तारागिरी (एफ 41) पुढील महिन्यात 3 एप्रिलला नौदलाच्या ताफ्यात येत आहे. आयएनएस तारागिरी प्रोजेक्ट 17 ए अंतर्गत बनवलेली चौथी युद्धनौका आहे. या युद्धनौकेला मुंबईतील माझगाव डॉक शिपर्बिल्ड्स लिमिटेडने तयार केले आहे. या युद्धनौकेचे वजन जवळपास 6670 टन आहे. याला बनवण्यासाठी 75 टक्के स्वदेशी उपकरणाचा वापर करण्यात आला आहे.