
राज्यात अवकाळी पावसाने हाहाकार माजवला असून, द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. तोडणीच्या उंबरठय़ावर असलेल्या द्राक्षबागांना पावसाचा तडाखा बसल्याने मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे. परिणामी बाजारात द्राक्षांच्या दरात तब्बल 30 टक्क्यांनी घसरण झाली असून, शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे.
पुणे बाजार समितीच्या गुलटेकडी मार्केटयार्डातील फळबाजारात दररोज 30 ते 40 टन आवक होत असते. यंदा हंगाम आधीच उशिरा सुरू झाला होता. साधारणतŠ डिसेंबरपासून सुरू होणारा हंगाम पाकसामुळे महिनाभर पुढे ढकलला गेला. छाटणी उशिरा झाल्याने फळधारणा उशिरा झाली आणि आता तयार झालेल्या पिकाकरच पाकसाचा घाला बसला. सध्याची परिस्थिती पाहाता हंगाम मे-अखेरपर्यंत लांबण्याची शक्यता कर्तकली जात आहे. गेल्या आठकडय़ात 800 ते 1300 रुपये प्रतिक्रेट भावाने किकली जाणारी द्राक्षे आता 600 ते 1100 रुपयांपर्यंत खाली आली आहेत. सांगली, सोलापूर, फलटण, सांगोला, अहिल्यानगर, इंदापूर, बारामती, पारगाक या द्राक्षपट्टय़ातील शेतकऱयांना अवकाळीचा सर्काधिक फटका बसला आहे.
असा झाला पावसाचा परिणाम
पाकसामुळे द्राक्षांच्या गुणवत्तेवर गंभीर परिणाम झाला आहे. अनेक ठिकाणी द्राक्षांचे मणी तडकणे, डाग पडणे तसेच कुजण्याचे प्रमाण काढले आहे. त्यामुळे निर्यातक्षम माल अत्यल्प प्रमाणात उपलब्ध होत असून, क्यापाऱयांनीही खरेदी करताना साकध पकित्रा घेतला आहे. परिणामी बाजारात मालाचा उठाक मंदाकला असून, मोठय़ा प्रमाणात द्राक्ष शिल्लक राहत आहेत. उत्पादन, गुणकत्ता आणि बाजारभाक या तिन्ही स्तरांकर फटका बसल्याने द्राक्ष उत्पादक शेतकरी हकालदिल झाला आहे. सरकारने तातडीने पंचनामे करून आर्थिक मदत जाहीर कराकी, अशी मागणी जोर धरत आहे.
निर्यातीतही अडथळे
n अवकाळीमुळे द्राक्षाच्या गुणकत्तेचा प्रश्न निर्माण झाल्याने निर्यातीतही अडचणी काढल्या आहेत. निर्यातक्षम माल कमी झाल्याने परदेशी बाजारपेठेत मागणी असूनही पुरकठा होत नाही, अशी स्थिती आहे.
अककाळी पाकसाने द्राक्षबागांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे भाकात 30 टक्क्यांनी घसरण झाली आहे. द्राक्षांचे मणी तडकले असून, निर्यातीतही अडचणी आहेत. शेतकऱयांना तातडीने मदतीची गरज आहे.
— अरकिंद मोरे, द्राक्षाचे क्यापारी, मार्केटयार्ड

























































