मुंबईच्या खारफुटीसाठी उद्या ‘महारॅली’; प्रशासनाने परवानगी बदलली तरी आंदोलक ठाम

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईतील खारफुटी (मँग्रोव्हज) वाचवण्यासाठी आणि मूलभूत हक्कांच्या मागणीसाठी उद्या (24 मार्च 2026), सकाळी 10 वाजता आयोजित करण्यात आलेल्या ‘महारॅली’च्या सुरुवातीच्या ठिकाणात अचानक बदल करण्यात आला आहे. आंदोलक पूजा रुपारेल यांनी सोशल मीडियाद्वारे माहिती दिली की, प्रशासनाकडून ऐनवेळी रॅलीच्या परवानगीत बदल करण्यात आले असले, तरी आंदोलक मागे हटणार नाहीत. उलट, आता अधिक उत्साहाने आणि मोठ्या संख्येने नागरिक या आंदोलनात सहभागी होतील, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Pooja Ruparel (@poojaruparel)

ही रॅली आता उद्या सकाळी 10 वाजता आझाद मैदानापासून सुरू होईल आणि गिरगाव चौपाटीपर्यंत काढली जाणार आहे. “पूर्वी आपल्या पूर्वजांनी स्वातंत्र्यासाठी लढा दिला, आज आम्ही जगण्यासाठी आवश्यक असलेल्या ऑक्सिजनसाठी (खारफुटी वाचवण्यासाठी) लढा देत आहोत,” असे भावनिक आवाहन रुपारेल यांनी आपल्या पोस्टमध्ये केले आहे. महापालिकेच्या धोरणांचा निषेध करण्यासाठी आणि लोकशाही मार्गाने आपले हक्क मांडण्यासाठी या रॅलीचे आयोजन करण्यात आले असून, मुंबईकरांनी यात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.