
भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण (एनएचएआय) ने फास्टॅगच्या वार्षिक पासची किंमत वाढवण्याची घोषणा केली आहे. येत्या 1 एप्रिल 2026 पासून या वार्षिक पाससाठी 3075 रुपये मोजावे लागतील. सध्या या पासची किंमत 3 हजार रुपये आहे. वाढलेली किंमत ही नॉन कमर्शियल वाहनांवर लागू होईल. जे फास्टॅग वार्षिक पासचा वापर करतात. या फीला नॅशनल हायवे फी नियम 2008 अंतर्गत वाढवण्यात आले आहे. ज्या वेळी 200 ट्रिप किंवा एक वर्ष पूर्ण झाल्यास फास्टॅगमध्ये आपोआप बदल होतात. वार्षिक पास हा 15 ऑगस्ट 2025 ला लाँच करण्यात आला आहे. सध्या 50 लाखांहून अधिक युजर्स या वार्षिक पासचा वापर करत आहेत. 2016 ला फास्टॅग लाँच झाल्यापासून आतापर्यंत एकूण 11.86 कोटी फास्टॅग जारी करण्यात आले आहेत. सध्या देशात अजूनही 5.9 कोटी फास्टॅग ऑक्टिव आहेत. देशातील राष्ट्रीय महामार्गावर 98 टक्के टोल आता फास्टॅगमधून कलेक्ट केला जातो.

























































