
दिल्लीचा अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वीच दिल्ली विधानसभेला बॉम्बने उडवून देण्याची धमकी मिळाली. या धमकीमुळे एकच खळबळ उडाली. त्यामुळे सकाळी 11 वाजता सुरू होणाऱ्या सभागृहाची कार्यवाही थांबवण्याची वेळ आली. धमकीचा ई-मेल मिळाल्यानंतर तत्काळ दिल्ली विधानसभेत स्निफर डॉग, बॉम्बशोधक पथक आणि इतर सर्व एजन्सींचे पथक घटनास्थळी पोहोचले. मात्र, शोध मोहिमेदरम्यान काहीही संशयास्पद आढळले नाही. पोलीस तपास करत आहेत. त्यानंतर अर्थसंकल्पीय अधिवेशनाची कार्यवाही अर्ध्या तासाच्या विलंबाने सुरू झाली.

























































