
विधानसभेत शक्ती सुधारणा विधेयकावर बोलताना शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, युवासेनाप्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी या कायदा देशभरात लागू होणं गरजेचं आहे, तसे होणार का असा सवाल केला आहे.
लैंगिक शोषण विरोधी कायदा किंवा कारवाई आहे ती निरपेक्ष असली पाहिजे. आणि जसा हा कायदा राज्यासाठी पारित केलेला आहे तसाच हा कायदा देशभरात लागू होणं गरजेचं आहे.
– आदित्य ठाकरे, आमदार pic.twitter.com/lBOxr8g7hu
— ShivSena – शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray (@ShivSenaUBT_) March 25, 2026
”आपण जे विधेयक, कायदा एकमताने पारित केले होते. त्यात आपण अजूनही सुधारणा करून पुढे आणत आहोत. याच्यात महत्त्वाच्या दोन गोष्टी आहेत. ‘लैंगिक अत्याचारावर जो कायदा आहे किंवा त्याच्यावर जी कारवाई असायला पाहिजे, ती ‘जेंडर न्यूट्रल’ असायला पाहिजे. दुसरी बाब अशी की आजही बाहेर जी परिस्थिती आहे त्यामुळे महिला शाळेत, कॉलेजमध्ये जायला किंवा ऑफिसला जायला घाबरतात. आपण ज्या काही तरतुदी करतोय त्या येणं तेवढंच महत्त्वाचं आहे. मी मुख्यमंत्री महोदयांना आपल्या माध्यमातून एकच विनंती करतो, हे जे सुधारणा विधेयक पारित करत आहोत, ते फक्त आपल्या राज्यासाठी आहे. असाच ठराव करून आपण केंद्रासाठी म्हणजे ‘भारतीय न्याय संहितेसाठी’ देखील करू शकतो का? असा सवाल आदित्य ठाकरे यांनी केला.
पुढे ते म्हणाले की, ”बऱ्याचदा ज्या काही घटना घडत असतात त्याचे काही सोर्स हे बाहेर असतात. त्यामुळे आपण जर हा ठराव केला तर त्याचा देशावर देखील चांगला परिणाम होऊ शकतो”, असे आदित्य ठाकरे म्हणाले.

























































