असं झालं तर… व्हॉट्सअॅपवर ओटीपीची समस्या उद्भवल्यास…

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

काही वेळा व्हॉट्सअॅपवर अचानक ओटीपी येण्यात अडचण येते. जर तुमच्या बाबतीत असे होत असेल तर सर्वात आधी काही गोष्टी काळजीपूर्वक फॉलो करा.

व्हॉट्सअॅप ओटीपी मिळवण्यासाठी इंटरनेट कनेक्शन आवश्यक आहे. त्यामुळे तुमचे वाय-फाय किंवा मोबाईल डेटा व्यवस्थित चालू आहे का, ते आधी तपासा.

एसएमएसव्यतिरिक्त, तुम्हाला पह्न कॉलद्वारे ओटीपी मिळवण्याचा पर्याय मिळतो. हा पर्याय निवडून तुम्ही कॉलद्वारे कोड मिळवू शकता.

काहीवेळा ओटीपी तुमच्या मेसेजिंग अॅपच्या स्पॅम पह्ल्डरमध्ये जाऊ शकतो. त्यामुळे तुमचा स्पॅम पह्ल्डर तपासा किंवा चुकीचा नंबर आहे का ते तपासा.

अनेक विनंत्या केल्याने ओटीपीसाठी तात्पुरती समस्या निर्माण येऊ शकते. त्यामुळे काही ठराविक मिनिटे वाट पाहून ओटीपीसाठी पुन्हा प्रयत्न करा.