
‘द एशियाटिक सोसायटी ऑफ बॉम्बे’च्या निवडणूक प्रक्रियेबाबत आलेल्या तक्रारींची दखल घेत निवडणूक प्रक्रिया नव्याने राबविण्यात येणार आहे, अशी माहिती राज्यमंत्री आशीष जयस्वाल यांनी विधान परिषदेत दिली. ‘द एशियाटिक सोसायटी ऑफ बॉम्बे’ या संस्थेच्या सदस्यांची निवडणूक दीर्घकाळ प्रलंबित असल्याबाबत तसेच निवडणूक जाहीर करून पारदर्शक पद्धतीने पार पाडण्याबाबत शासन कोणती कार्यवाही करणार, याबाबत आमदार प्रसाद लाड यांनी प्रश्न उपस्थित केला होता.
























































