
हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त शिवसेना व युवासेना शाखा क्र. 198 च्या वतीने शनिवारी डिलाईल रोड येथील ना. म. जोशी मार्ग शाळा येथे आयोजित भव्य रोजगार मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शिवसेना नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांच्या हस्ते या मेळाव्याचे उद्घाटन करण्यात आले. या रोजगार मेळाव्यात 60 हून अधिक कॉर्पोरेट कंपन्यांनी सहभाग घेतला तर सुमारे 400 हून अधिक गरजू तरुण-तरुणींनी उपस्थित राहून मुलाखती दिल्या.
युवासेना सहसचिव प्रथमेश बोभाटे व शाखा अधिकारी नितीन शिरोडकर यांच्या पुढाकारातून आयोजित या मेळाव्याला शिवसेना उपनेते आमदार सचिन अहिर, आमदार सुनील शिंदे, शिवसेना उपनेत्या- नगरसेविका किशोरी पेडणेकर, शिवसेना सचिव सूरज चव्हाण, भारतीय विमा कर्मचारी सेना सरचिटणीस दिनेश बोभाटे यांची प्रमुख उपस्थिती होती. विभागप्रमुख आशीष चेंबूरकर, नगरसेविका हेमांगी वरळीकर, निरंजन नलावडे, हरीश वरळीकर, राम साळगावकर, अश्विनी पवार, आकर्षिका पाटील, छाया कोळी, अरविंद भोसले, नंदू गावडे, जीवन भोसले, अब्दुल रजाक, उमेश नाईक, श्रीराम विश्वासराव, उल्हास बिले, शरद एक्के, विलास जाधव, प्रदीप पाटील, मंगेश कदम तसेच बाळा खोपडे आदींनी या उपक्रमाला पाठिंबा दिला. या उपक्रमात एएमपी अध्यक्ष अमीर इदरसी यांचे सहकार्य लाभले. उपक्रमाचे निमंत्रक अबोली खाडये असून दीपक बागवे, शारदा पापन, स्नेहल देशमुख, किशोरी काजोळकर यांचे योगदान लाभले.
राज्यभरात रोजगार मेळावे घेणार – आदित्य ठाकरे
शिवसेना म्हणजे 80 टक्के समाजकारण आणि 20 टक्के राजकारण. रोजगारासाठी शिवसेना देशभरात ओळखली जाते. भारतीय कामगार सेना, स्थानीय लोकाधिकार समिती स्थानिकांना व भूमिपुत्रांना न्याय आणि रोजगार मिळवून देण्याचे काम करतात. या मेळाव्यात दहावी नापासपासून ते पीएचडीपर्यंत अनेकांना रोजगाराची संधी मिळाली. असे मेळावे राज्यभरात घेणार, असे शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी सांगितले.






























































