
अहमदपूर येथून चिखली तालुक्यातील सैलानी बाबाच्या दर्शनासाठी जात असलेल्या भाविकांच्या वाहनाला आज सकाळी भीषण अपघात झाला. मेहकर तालुक्यातील नांद्रा धांडे फाट्याजवळ अंदाजे पावणे सात वाजेच्या सुमारास चालकाला डुलकी लागल्याने पिकअप उलटली. या अपघातात दोन तरुण जागीच ठार झाले असून १७ जण जखमी झाले आहेत. सर्व जखमींवर मेहकर ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले.
अहमदपूर येथील बागवान कुटुंब रात्री उशिरा एम.एच. १३ सी.यु. ७६७० या पिकअप वाहनाने चिखली तालुक्यातील सैलानी येथील बाबाच्या दर्शनासाठी निघाले होते. पिकअपमध्ये २० ते २२ प्रवासी असल्याची प्राथमिक माहिती आहे. नांद्रा धांडे फाट्याजवळील एका धोकादायक वळणावर चालकाचा ताबा सुटल्याने वाहन पलटी झाले. धक्कादायक म्हणजे या अपघातात चालकाला मात्र कोणतीही इजा झाली नाही.
मृतकांची नावे
१. अरमान शरीफ बागवान (वय १८ वर्षे)
२. रेहान सैदू बागवान (वय १८ वर्षे) अशी आहे तर
या अपघातात खालील १७ जण जखमी झाले असून, त्यापैकी ६ जणांना पुढील उपचारासाठी खासगी रुग्णालयात हलवण्यात आले आहे:
* अनिस पाशा बागवान (वय ३०)
* सायरा बी पाशा बागवान (वय ६०)
* इफत शरीफ बागवान (वय ११)
* शरीफ पाशा बागवान (वय ३७)
* शबाना शरीफ बागवान (वय ३५)
* काकीया आरिफ बागवान (वय १५)
* हिना आरिफ बागवान (वय ३०)
* आलिया अनिस बागवान (वय ३०)
* बुशरा आरिफ बागवान (वय ५)
* हाफिस रौफ बागवान (वय १५)
* शाहाणा नबीसाब बागवान (वय ३४)
* महेवेश नबीसाब बागवान (वय ७)
* नबी साब करीम साब बागवान (वय ४७)
* पाशा मोहम्मद साब बागवान (वय ६५)
* आमेर नबी बागवान (वय १३)
* अनस रौफ बागवान (वय १२)
* अबुजर खैदु बागवान (वय १२)
घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक व्यंकटेश्वर आलेवार, उपनिरीक्षक किरण खाडे, पोलीस कर्मचारी इब्राहिम परसुवाले, चालक शिवाजी चिन व इतर सहकाऱ्यांनी घटनास्थळी व रूग्णालयात धाव घेऊन पंचनामा केला.पुढील तपास मेहकर पोलीस करीत आहेत.


























































