
गॅस सिलिंडरच्या तुटवडय़ामुळे गृहिणींसोबत अनेक हॉटेल व्यावसायिकदेखील हवालदिल झाले आहेत. मुंबईकरांना दिलासा देण्यासाठी शिवसेना ग्राहक संरक्षण कक्ष अंधेरी पूर्वचे विधानसभा संघटक व भारतीय कामगार सेना सहचिटणीस राम साळवी यांनी शिवसेना नेते व शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाचे अध्यक्ष खासदार अनिल देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली विधानसभा क्षेत्रातील गॅस एजन्सी कार्यालयांना भेट दिली.
येणाऱ्या काळात गॅस सिलिंडरचे वितरण पूर्णपणे पारदर्शक, नियमबद्ध व प्रामाणिक पद्धतीने करण्यात यावे, कोणताही काळाबाजार होणार नाही याची खबरदारी घ्यावी, कोणताही गैरप्रकार आढळून येताच कक्षातर्फे कायदेशीर कारवाई करण्यात येईल, अशी तंबी यावेळी गॅस एजन्सी व्यवस्थापनाला निवेदनाद्वारे देण्यात आली. यावेळी ग्राहक संरक्षण कक्ष कार्यालय चिटणीस देवेंद्र भोसले, विधानसभा कक्ष प्रसारक सत्यवान पवार, कक्ष उपसंघटक गणेश आढाव, कक्ष उपसंघटक मंगेश तेरवणकर, कक्ष वॉर्ड संघटक मोहन जगताप, कक्ष वॉर्ड संघटक मोहन कांगणे, कक्ष वॉर्ड संघटक विलास सुर्वे, कक्ष वॉर्ड संघटक नीलेश पांचाळ आदी उपस्थित होते.


























































