
दिल्लीत वाढत्या वायू प्रदूषणाला रोखण्यासाठी दिल्ली सरकारने काही मोठे निर्णय घेतले आहेत. या निर्णयांतर्गत 1 नोव्हेंबरपासून दिल्लीत अवजड वाहनांना प्रवेश करण्यास बंदी घालण्यात आली आहे. तसेच पीयूसी नसेल तर वाहनांना इंधन मिळणार नाही. मुख्यमंत्री जनसेवा सदनमध्ये एक उच्चस्तरीय समीक्षा बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत प्रदूषण रोखण्यासाठी काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. स्वच्छ परिवहन, धुळीवर नियंत्रण, कचरा नियंत्रणासाठी पुरेसा निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे. शहरात एएनपीआर कॅमेरे आणि डिजिटल सिस्टम लावले जातील, असे सांगितले.

























































