
आम आदमी पक्षाने (AAP) खासदार राघव चढ्ढा यांच्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपविरोधातील सर्व जुन्या पोस्ट्स सोशल मीडियावरून हटवल्याचा आरोप केला आहे. पक्षाचे वरिष्ठ नेते सौरभ भारद्वाज यांनी ‘एक्स’वर पोस्ट करत हा दावा केला असून त्यासाठी काही स्क्रीनशॉट्सही शेअर केल्याचे सांगितले आहे.
भारद्वाज यांनी म्हटले की, “राघव चड्ढांनी आपल्या ‘एक्स’वरील टाइमलाइन पूर्णपणे साफ केली आहे. मोदी किंवा भाजपवर टीका करणाऱ्या सर्व जुन्या पोस्ट्स गायब झाल्या आहेत.” त्यांनी पुढे सांगितले की, ‘BJP’ आणि ‘Modi’ या शब्दांनी शोध घेतल्यानंतरही पूर्वीची कोणतीही टीकात्मक पोस्ट दिसून आली नाही. सध्या केवळ दोन पोस्ट शिल्लक असून त्या देखील पंतप्रधानांच्या स्तुतीतील असल्याचा दावा त्यांनी केला.
“हे साधे क्लीनअप नसून Digital History पुसून टाकण्यासारखे आहे. एकेकाळी मोदी आणि भाजपचे तीव्र टीकाकार असलेले चड्ढा आता वेगळी प्रतिमा तयार करत आहेत,” असा आरोपही भारद्वाज यांनी केला.
आम आदमी पक्षाने राघव चड्ढा यांना राज्यसभेतील उपनेतेपदावरून हटवून त्यांच्या जागी अशोक मित्तल यांची नियुक्ती केली, तेव्हा हा वाद सुरू झाला. या निर्णयावर काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षांकडून टीका करण्यात आली होती. यावर प्रतिक्रिया देताना चड्ढा यांनी आपण करसुधारणा आणि विमानतळावरील अन्नावरील दरांसारखे महत्त्वाचे मुद्दे उपस्थित करत असल्याचे सांगितले होते.
मात्र आपने पलटवार करत चड्ढा केवळ सोयीस्कर मुद्दे मांडत असल्याचा आरोप केला. पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनीही चड्ढांवर टीका करत ते “चड्ढा यांनी तडजोड केली आहे असा आरोप केला. “पक्षाच्या निर्णयांचे पालन न केल्यास ते पक्षशिस्तीच्या विरोधात जाते,” असेही त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, आप नेत्या अतिशी मारलेना यांनी भाजपवर निशाणा साधत, “भाजप विरोधी नेत्यांना धमक्या, दबाव किंवा प्रलोभन देऊन पक्षात घेतो. कदाचित चड्ढांच्या बाबतीतही असेच काही घडत असेल,” असा आरोप केला.
राघव चड्ढा ने अपने X टाइमलाइन को पूरी तरह साफ कर दिया है , मोदी या भाजपा के खिलाफ जितनी भी पुरानी आलोचनात्मक पोस्ट्स थीं, वे सब गायब!
मैंने उनके पूरे अकाउंट को “BJP” और “Modi” शब्दों से गहराई से सर्च किया।
नतीजा चौंकाने वाला है , कोई भी पुरानी आलोचना अब दिखाई नहीं देती।
“Modi”… pic.twitter.com/sTodxW8YHd
— Saurabh Bharadwaj (@Saurabh_MLAgk) April 4, 2026























































