काँग्रेसची सत्ता आल्यावर सरमा यांना अटक करणार, आसाममध्ये राहुल गांधी यांची घोषणा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांच्यावर तीव्र टीका करत त्यांना “देशातील सर्वाधिक भ्रष्ट आणि द्वेष पसरवणारे मुख्यमंत्री” असे म्हटले आहे. त्यांनी असा आरोप केला की, आसाममध्ये सध्या जे काही वातावरण आहे, त्यासाठी मुख्यमंत्री सरमा जबाबदार आहेत.

राहुल गांधी म्हणाले की, “आसामला कोणीही तोडण्याचे काम केले नाही. मात्र आज देशात सर्वाधिक भ्रष्ट, सर्वाधिक द्वेष पसरवणारे आणि सतत चुकीची विधाने करणारे मुख्यमंत्री म्हणजे आसामचे मुख्यमंत्री आहेत.” त्यांनी पुढे असा सवाल उपस्थित केला की, “सरमा सतत वादग्रस्त आणि उलटसुलट वक्तव्ये का करतात? कारण त्यांना माहिती आहे की काँग्रेस पक्ष त्यांना तुरुंगात टाकणार आहे.”

गांधी यांनी पुढे आरोप करत म्हटले की, हिमंता सरमा यांनी आसामच्या जनतेला फसवले आणि दिशाभूल केली आहे. “याचे पुरावे जनतेसमोर आहेत. आसामची जनता त्यांच्या भ्रष्टाचाराला कधीच माफ करणार नाही आणि त्यांना शिक्षा होणारच,” असेही त्यांनी ठामपणे सांगितले.