
वायुदलाचे सामर्थ्य आणखी मजबूत करण्यासाठी संरक्षण मंत्रालयाने स्वदेशी 1000 किलो हवाई बॉम्ब खरेदी करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. यासाठी संरक्षण मंत्रालयाने 600 बॉम्बसाठी स्वदेशी कंपन्यांकडून माहिती मागवली आहे. वायुसेना आणि संरक्षण मंत्रालयाने एक्सप्रेशन ऑफ इंटरेस्टदेखील जारी केला आहे.
स्वदेशी बॉम्ब अमेरिकेच्या एमके-84 वर्गातील बॉम्बइतके शक्तिशाली असतील. एमके-84 बॉम्ब सुमारे 2000 पाऊंड म्हणजेच अंदाजे 907 किलो विस्पह्टक वाहून नेऊ शकतो. त्यामुळे हे बॉम्ब शत्रूचे मोठे तळ, पूल, रनवे, गोदामे किंवा इतर लष्करी ठिकाणे पूर्णपणे नष्ट करण्याची क्षमता ठेवतात. आतापर्यंत हिंदुस्थानची वायुसेना अशा प्रकारचे बॉम्ब परदेशातून खरेदी करत होती. मात्र आता ते देशातच तयार केले जाणार आहेत.
पूर्णपणे स्वदेशी बनावटीचे बॉम्ब
संरक्षण मंत्रालयाने जारी केलेल्या सूचनेनुसार, एकूण 600 स्वदेशी 1000 किलो हवाई बॉम्ब तयार करून खरेदी केले जाणार आहेत. बॉम्बची वैशिष्टय़े पाहता स्पह्टानंतर हे बॉम्ब तुकडय़ांमध्ये विखुरले जातील आणि मोठय़ा क्षेत्रात नुकसान करतील. हे उच्च क्षमतेचे बॉम्ब असून रशियन आणि पाश्चात्य अशा दोन्ही प्रकारच्या विमानांवर वापरता येतील. हा प्रकल्प दोन टप्प्यांत पूर्ण केला जाणार आहे.
600 बॉम्ब खरेदी केले जाणार…
पहिल्या टप्प्यात सहा प्रोटोटाइप बॉम्ब तयार केले जातील. यात विस्पह्टक आणि बिनविस्पह्टक बॉम्बचा समावेश असेल. यामध्ये टेल युनिट व इतर उपकरणे विकसित केली जातील. या टप्प्यात किमान 50 टक्के स्वदेशी सामग्री वापरणे आवश्यक असेल. दुसऱ्या टप्प्यात पात्र कंपन्यांना कमर्शियल रिक्वेस्ट फॉर प्रपोजल जारी केला जाईल आणि त्यानंतर एकूण 600 बॉम्बची खरेदी करण्यात येईल.
n प्रकल्प पूर्ण होण्यासाठी सुमारे अडीच वर्षांचा कालावधी लागणार आहे. यात प्रोटोटाइप तयार करणे, युजर ट्रायल्स, मूल्यांकन, व्यावसायिक प्रक्रिया आणि अंतिम करार यांचा समावेश असेल. या चाचण्या हिंदुस्थानात वायुसेनेच्या ठिकाणी आणि ठरावीक विमानांवर करण्यात येणार आहेत.
n या स्वदेशी 1000 किलो हवाई बॉम्बमुळे वायुसेनेची फायर पॉवर मोठय़ा प्रमाणात वाढणार असून परदेशी शस्त्रांवरील फारसे अवलंबून रहावे लागणार नाही.

























































