
बास्केटबॉल पोल अंगावर कोसळून बी टेकच्या विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. ही घटना रविवारी सकाळी सातच्या सुमारास मावळ तालुक्यातील इंदोरी येथील तोलानी मेरीटाईम इन्स्टिटय़ूटमध्ये घडली.
विशाल बाबुराम वर्मा (20, रा. तोलानी मेरीटाईम इन्स्टिटय़ूट विद्यार्थी वसतिगृह, इंदोरी, मावळ, मूळ – अयोध्या, उत्तर प्रदेश) असे मृत्यू झालेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. तळेगाव एमआयडीसी ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पाटील यांनी याबाबत माहिती दिली. तळेगाव-चाकण रस्त्यावर इंदोरी येथे तोलानी मेरीटाईम इन्स्टिटय़ूट आहे. या इन्स्टिटय़ूटमध्ये विशाल हा बीटेकच्या दुसऱया वर्गात शिकत होता. तो ऍथलेटिक्सचा खेळाडू होता.




























































