तमिळनाडू ‘त्रिभाषा सूत्र’ कधीही स्वीकारणार नाही; उदयनिधी स्टॅलिन यांचे स्पष्ट मत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

तमिळनाडूचे उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन यांनी सोमवारी भाषा वादावरून मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांच्यावर टीका केल्याबद्दल केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्यावर निशाणा साधला. तमिळनाडू राज्य कधीही ‘त्रिभाषा सूत्र’ स्वीकारणार नाही, तर तमिळ आणि इंग्रजी या ‘द्विभाषा धोरणा’चेच पालन करेल, असे त्यांनी स्पष्ट केले.

केंद्र सरकार तमिळनाडूवर राष्ट्रीय शिक्षण धोरण (NEP) लागू करण्यासाठी दबाव आणत असून, त्या माध्यमातून राज्यावर हिंदी लादण्याचा मार्ग मोकळा केला जात आहे, असा दावा त्यांनी केला. राष्ट्रीय शिक्षण धोरण स्वीकारणे म्हणजे केंद्र सरकारला तमिळनाडूवर हिंदी लादण्याची मुभा देणे होय, असेही ते म्हणाले.

जिल्ह्यातील तिरुवैयारू येथे द्रमुक (DMK) उमेदवार दुराई चंद्रशेखरन यांच्या प्रचारादरम्यान उदयनिधी म्हणाले, ‘आम्ही हे कधीही स्वीकारणार नाही. आम्ही नेहमीच तमिळ आणि इंग्रजी या द्विभाषा धोरणाचे पालन करू.’