ट्रेंड – परदेशात उसाच्या रसाने भाव खाल्ला!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

उन्हात एक ग्लास गारेगार उसाचा रस मनाला आणि शरीराला आराम देणारा ठरतो. आपल्या देशात रस्त्यावर सहज मिळणारा उसाचा रस आपण नेहमी स्वस्तात पितो. म्हणजे पुठे 10 रुपये ग्लास, तर पुठे 20 रुपये ग्लास असा तो मिळतो, पण हाच साधा उसाचा रस आता युरोपमध्ये स्टार ड्रिंक बनला आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडीओमध्ये परदेशातील लोक मोठय़ा आवडीने उसाचा रस पीत असल्याचे दिसते. विशेष म्हणजे रस काढण्याची पद्धत अगदी देशी आहे. तीच मशीन, तोच अंदाज, पण ग्राहक मात्र पूर्णपणे विदेशी आहेत आणि ते लाईन लावून हा रस घेत आहेत. असंही समजतंय की, तिथे एका ग्लाससाठी सुमारे 5 युरो म्हणजेच जवळपास 500-550 रुपये मोजावे लागतात. ही किंमत ऐपून नेटकरी थक्क झाले आहेत.