
नखांमधील घाण सुरक्षितपणे काढण्यासाठी सर्वात आधी मीठ किंवा हळद टाकलेल्या कोमट पाण्यात पाय बुडवा. त्यानंतर मऊ टॉवेलने पाय नीट पुसावेत. नखांमधील घाण काढताना खूप टोकदार वस्तू वापरू नयेत.
n स्वच्छ, मऊ नेल ब्रश किंवा कापसाच्या बोळ्याने हलक्या हाताने घाण काढणे सुरक्षित असते. पायाची नियमित स्वच्छता राखावी. दररोज पाय साबणाने धुणे, विशेषतः बोटांच्या मधल्या जागा आणि नखांच्या कडा स्वच्छ कराव्यात.




























































