
उत्तराखंडमधील प्रसिद्ध चारधाम यात्रा 19 एप्रिलला सुरुवात होणार असून हेलिकॉप्टर बुकिंगला सुरुवात झाली आहे. 22 एप्रिलला केदारनाथ मंदिराचे दरवाजे भाविकांसाठी उघडले जाणार आहेत. तर 23 एप्रिलला बद्रीनाथ मंदिराचे दरवाजे उघडले जातील. शिखांचे पवित्र तीर्थक्षेत्र असलेल्या हेमकुंड साहिबचे दरवाजे 23 मे रोजी उघडले जाणार आहेत. केदारनाथला येणाया यात्रेकरूंच्या सोयीसाठी फाटा, गुप्तकाशी आणि सिरसी या तीन मुख्य ठिकाणावरून शटल हेलिकॉप्टर सेवा पुरवली जाते. हेलिकॉप्टरच्या प्रवासासाठी सिरसीमार्गे 6 हजार 390 रुपये, फाटा मार्गे 10,164 रुपये, गुप्तकाशी मार्गे 12 हजार 762 रुपये आकारले जातील. एकावेळी एका यूजर आयडीवरून जास्तीत जास्त 6 तिकीटे बुक केली जाऊ शकतात. तिकीट रद्द झाल्यानंतर यूजर्सचे पैसे 5 ते 7 दिवसाच्या आत खात्यात जमा होतील.

























































