आशा भोसले ब्रीच कँण्डी रुग्णालयातप्रकृती चिंताजनक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ज्येष्ठ पार्श्वगायिका आशा भोसले यांना ब्रीच कँडी रुग्णालयात सायंकाळी अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले आहे. त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यांच्यावर तज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली आयसीयूमध्ये उपचार सुरू असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते.

आशा भोसले यांना अस्वस्थ वाटू लागल्यामुळे ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी त्यांच्यावर तातडीने उपचार सुरू केले असून, त्यांच्या प्रकृतीवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे. आशा भोसले यांची नात जनाई भोसले हिने सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे. पोस्टमध्ये जनाईने म्हटलंय, ‘माझी आजी, आशा भोसले यांना अती थकवा आणि फुप्फुसाच्या संसर्गामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर उपचार सुरू असून सर्व काही ठीक होईल, असा विश्वास आहे. आम्ही लवकरच सकारात्मक माहिती देऊ.’