नालासोपाऱ्यात तीन तस्करांवर झडप दोन तलवारी, चार गुप्त्या जप्त

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
Mumbai Crime Delivery Boy Arrested for Theft

तडीपार गुन्हेगारांचे माहेरघर अशी ओळख असलेल्या नालासोपाऱ्यात बेकायदेशीर हत्यारे बाळगणाऱ्या टोळीचा वसई गुन्हे शाखा कक्ष-२ ने पर्दाफाश केला आहे. प्रगतीनगर येथे टाकलेल्या छाप्यात पोलिसांनी दोन तलवारी आणि चार गुप्त्या अशी एकूण सहा शस्त्र साठा जप्त केला आहे. याप्रकरणी एका अल्पवयीन मुलासह तिघांना अटक करण्यात आली आहे.

गुन्हे शाखा कक्ष-२ चे पथक नालासोपारा पूर्वेत गस्त घालत होते. सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक रवी पवार यांना प्रगतीनगर परिसरातील एका गाळ्यात विविध प्रकारची शस्त्रे लपवून ठेवली आहेत अशी माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलीस निरीक्षक अविराज कुराडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सोपान पाटील व त्यांच्या पथकाने प्रगतीनगर येथील ‘अशोक सिंह चाळ’ येथील गाळ्यावर छापा मारला. या दरम्यान झडती घेतली असता पोलिसांना दोन तलवारी व चार गुप्त्या अशी धारदार शस्त्रे सापडली आहेत. याप्रकरणी तीन जणांना पोलिसांनी अटक केली आहे. यात शोएब अख्तर, फैजान खान व एका अल्पवयीन मुलाचा समावेश आहे.