संगीत विश्वातील अमर आवाज शांत झाला, उद्धव ठाकरे यांच्याकडून आशा भोसले यांना श्रद्धांजली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आशा भोसले यांच्या निधनाची बातमी ऐकून अत्यंत दुःख झाले. भारतीय संगीत विश्वातील एक अमर आवाज आज शांत झाला, अशा शोकभावना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केल्या.

‘‘आशा भोसले यांच्या स्वरांनी अनेक पिढ्यांना आनंद दिला, भावनांना स्पर्श केला. त्या एक दिलखुलास व्यक्तिमत्त्व होते. लतादीदी यांच्यानंतर त्या संगीत क्षेत्रातील एका महान पर्वाच्या स्तंभाप्रमाणे उभ्या होत्या. भारतीय संगीत क्षेत्रातील हा स्तंभ कोसळला, त्यांचे गाणे हेच त्यांचे अमरत्व राहील,’’ असे नमूद करत उद्धव ठाकरे यांनी आशाताईंच्या स्मृतीला विनम्र श्रद्धांजली वाहिली.

जिव्हाळ्याचं नातं

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं मंगेशकर कुटुंबियांशी जिव्हाळ्याचं नातं होतं. लतादीदी आणि आशाताईंनी हे नातं कायम जपलं. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना आशाताईंनी निवासस्थानी जाऊन उद्धव ठाकरे यांचे वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन केले होते. या वेळी रश्मी ठाकरे, आशाताईंची नात जनाई उपस्थित होते. या भेटीचे पह्टो आशाताईंनी समाजमाध्यमांत पोस्ट केले होते.