देश विदेश- सॅम अल्टमन यांच्या घरावर हल्ला 

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ओपनएआयचे सीईओ सॅम अल्टमन यांच्या घरावर पेट्रोल बॉम्बचा हल्ला झाला. याप्रकरणी 20 वर्षीय संशयिताला सॅन फ्रान्सिस्को पोलिसांनी अटक केली. डॅनियल मोरेनो गामा असे त्याचे नाव आहे. त्याच्यावर हत्येच्या प्रयत्नाचे दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलिसांच्या माहितीनुसार पुराव्याच्या आधारे ही अटक झाली आहे. सध्या आरोप निश्चितीची प्रक्रिया सुरू आहे. सध्या एका आरोपीला अटक झाली असली तरी अजून सखोल तपास सुरू आहे.

पाकिस्तानी चॅनेलला नोटीस

दिवंगत गायिका  आशा भोसले यांची गाणी दाखवल्याबद्दल  पाकिस्तानच्या माध्यम नियामक प्राधिकरणाने ‘जिओ न्यूज’ या देशातील सर्वांत मोठय़ा ‘मीडिया हाऊस’ला  कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. या चॅनेलने हिंदुस्थानी गाणी आणि  चित्रपटांमधील दृश्ये प्रसारित केल्याचे नोटिसीत नमूद करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर पाकिस्तानी पत्रकार आणि मानवी अधिकार कार्यकर्त्यांनी माध्यमांच्या गळचेपीविरोधात आवाज उठवला आहे.

मोहुर्ली गेटवर वाघाचे दर्शन, पर्यटकांना पर्वणी

चंद्रपूर जिह्यातील ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात बुधवारी अनोखा आनंददायक अनुभव पर्यटकांना आला. वाघ पाहण्यासाठी जंगल सफारी करणाऱया पर्यटकांना थेट मोहुर्ली गेटवरच वाघाचे दर्शन झाले. वाघाला जवळून पाहण्यासाठी पर्यटकांनी गेट परिसरात गर्दी केली होती. काहींनी या क्षणाचे पह्टो आणि व्हिडीओही आपल्या मोबाईलमध्ये पैद केले. ताडोबात वाघ दर्शन हा पर्यटकांसाठी नेहमीच खास आकर्षण असतो, मात्र गेटवरच वाघाचे दर्शन होणे पर्यटकांसाठी पर्वणी ठरली.

35 हजार किलोंची अवैध सुपारी केली जप्त 

हिंदुस्थानच्या तटरक्षक दलाने मोठी कारवाई करत तस्करांच्या मुसक्या आवळल्या. तटरक्षक दलाच्या ‘अमोघ’ जहाजाने बांगलादेशातून होणाऱया अवैध हालचाली रोखताना दोन बोटींना समुद्रातच घेरले. या कारवाईत 35 हजार किलो सुपारी जप्त करण्यात आली. त्याची अंदाजे किंमत 1 कोटी 65 लाख रुपये आहे. अत्यंत नियोजनबद्ध आणि उत्पृष्ट समन्वयाने तटरक्षक दलाने ही मोहीम फत्ते केली. तटरक्षक दलाच्या जवानांनी तस्करांना कोणतीही संधी दिली नाही.

जगन्नाथ मंदिरातील रत्न भांडार खुले

ओडिशा येथील पुरीच्या जगन्नाथ मंदिरातील रत्न भांडार 48 वर्षांनंतर खुले झाले आहे. सध्या मंदिरातील खजिन्याची मोजणी सुरू आहे. दोन टप्प्यांत ही मोजणी होणार आहे. 13 एप्रिलपासून अंतर्गत मोजणी सुरू झाली आहे. ती 16 ते 18 एप्रिलदरम्यान सुरू राहील. मंदिर परिसरात भगवान जगन्नाथ, बलभद्र आणि देवी सुभद्रा यांचे बहुमूल्य रत्न आणि दुर्मिळ आभूषण आहेत. रत्न भांडाराची मोजणी होईपर्यंत त्या स्थळी समिती सदस्यांव्यतिरिक्त अन्य पुणालाही प्रवेश करता येत नाही.