
नाशिकच्या आयटी कंपनीतील महिलांचे लैंगिक शोषण आणि धर्मांतर प्रकरणातील मुख्य सूत्रधार फरार निदा खान हिची अटकपूर्व जामिनासाठी धडपड सुरू आहे.
एका महिलेवरील लैंगिक अत्याचार व धर्मांतर, एका पुरुष कर्मचाऱ्याच्या धर्मांतराचा प्रयत्न आणि अन्य महिलांचा विनयभंग याप्रकरणी नऊ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. एका महिला अधिकाऱ्यासह आयटी कंपनीतील एपूण सात अधिकाऱ्यांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाची सूत्रधार निदा खान ही गेल्या 21 दिवसांपासून फरार आहे, ती गरोदर असल्याचे कारण पुढे करून तिच्या नातेवाईकांमार्फत तिला अटकपूर्व जामीन मिळविण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.




























































