
यंदाच्या चारधाम यात्रेसाठी भाविकांत मोठा उत्साह पाहायला मिळत आहे. 22 एप्रिल ते 15 जून या कालावधीसाठी केदारनाथ हेलिकॉप्टर शटल सेवेचे ऑनलाइन बुकिंग अवघ्या 90 मिनिटांत फुल्ल झाले आहे. हेलिकॉप्टर सेवेचे सर्वाधिक 1,708 बुकिंग महाराष्ट्रातून झाले आहे. त्याखालोखाल उत्तर प्रदेशातून 1243 तर दिल्ली (867) बुकिंग झाले आहे.



























































