हे करून पहा कडक उन्हात त्वचा काळवंडते-रापते

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

 

उन्हाळ्यात घराबाहेर पडताना त्वचेची योग्य काळजी घेतली नाही तर टॅनिंग, त्वचा काळवंडणे, रापणे आणि कोरडेपणा अशा समस्या वाढू शकतात. सनस्क्रीन लावल्यास सूर्यकिरणांचा त्वचेवर होणारा परिणाम कमी करण्यास मदत मिळते.

चेहरा दिवसांतून दोन वेळा सौम्य फेसवॉशने चेहरा स्वच्छ केल्यास त्वचा फ्रेश राहण्यास मदत होते. दिवसभर पुरेसे पाणी पिणे, फळे खाणे आणि ताजे पदार्थ आहारात ठेवणे महत्त्वाचे आहे. बाहेर पडताना स्कार्फ, टोपी, सनग्लासेस वापरा.