असं झालं तर… फोन स्लो चार्ज होतोय का?

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
  1. स्मार्टफोनला खरेदी करून सहा महिने झाल्यानंतर फोन स्लो चार्ज होत असल्याच्या अनेक ग्राहकांच्या तक्रारी असतात. जर तुमच्या बाबतीत असं झालं तर काय कराल?

2. सर्वात आधी चार्जिंग केबल आणि अ‍ॅडाप्टर तपासून घ्या. तुमचे मूळ चार्जर किंवा इतर चांगल्या दर्जाचे चार्जरने फोन चार्ज केल्यास फोन स्लो चार्ज होत नाही.

3. फोन चार्जिंगला असताना गेम खेळणे किंवा व्हिडीओ पाहणे टाळा. यामुळे फोन गरम होतो आणि चार्जिंगचा वेग मंदावतो. त्यामुळे ही चूक करणे नेहमी टाळा.

4. फोनच्या चार्जिंग सॉकेटमध्ये कचरा किंवा धूळ अडकली असल्यास पिन व्यवस्थित बसत नाही. टूथपिकच्या मदतीने ते हळुवारपणे स्वच्छ करा.

5. फोन चार्जिंगला लावताना एअरप्लेन मोड चालू केल्यास नेटवर्क आणि बॅकग्राऊंड अ‍ॅप्सचे बॅटरी वापरणे थांबते. यामुळे फोन लवकर चार्ज होतो.