आरे येथील धार्मिक स्थळावर कारवाई

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

वांद्रे येथील गरीबनगरनंतर मुंबई महापालिकेने गोरेगावच्या आरे येथील धार्मिक स्थळावर आज कारवाई केली. कारवाईदरम्यान कोणतीही अनुचित घटना घडू नये म्हणून पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात ठेवला होता.

आरे कॉलनी येथील युनिट 32 येथे एक धार्मिक स्थळ होते. ते धार्मिक स्थळ गेल्या अनेक वर्षांपासून होते. त्या जागेबाबत अतिक्रमण झाले होते. तसेच त्या धार्मिक स्थळाबाबत ट्रस्ट स्थापन केली होती. त्या ट्रस्टला कायदेशीर नोटीस दिली होती. ते अतिक्रमण काढून टाकावे किंवा त्या जागेबाबत काही कागदपत्रे असल्यास सादर करावी असे सांगण्यात आले होते. त्यांना ते कागदपत्र सादर करणे शक्य झाले नाही. आरे प्रशासनाने पोलिसांना बंदोबस्त द्यावा याबाबत विनंती केली. त्यानुसार तेथे पोलीस बंदोबस्त पुरवण्यात आला होता असे पोलीस उपायुक्त गजानन राजमाने यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सांगितले.