साताऱ्यात १८ जूनला ‘साहित्य संमेलन’

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

‘ज्ञानकोषकार डॉ. श्रीधर व्यंकटेश केतकर प्रथम साहित्य संमेलन’ १८ जून रोज साताऱ्यात आयोजित केले आहे. लोकमंगल समूह शिक्षण संस्था, सातारा आणि केतकर कुलमहा सभा यांच्या संयुक्त विद्यमाने मराठीतील प्रथम ज्ञानकोष निर्माते कै. डॉ. श्रीधर केतकर यांना आदरांजली वाहण्यासाठी या संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.
साताऱ्यातील लोकमंगल हायस्कूल नागेवाडी कुशी येथे साहित्य संमेलन साजरे होणार आहे. सकाळी १० वाजता उद्घाटन सोहळा होईल आणि संध्याकाळी ५ वाजता सांगता समारोह होईल. संमेलनाचे प्रायोजकत्व आणि यजमान पद लोकमंगल समूह शिक्षण संस्था सातारा यांनी घेतले आहे. तर संमेलनाचे अध्यक्ष म्हणून प्राचार्य आणि सुप्रसिद्ध साहित्यिक श्याम भुर्के यांच निवड करण्यात आली असून केतकर कुल महासभेचे अध्यक्ष प्रकाश केतकर यांची कार्याध्यक्षपदी, सातार जिल्हा ग्रंथ महोत्सव समितीचे कार्यवाह शिरीष चिटणीस यांची स्वागताध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे. हे संमेलन निःशुल्क असून साहित्य-कलाप्रेमी, कथा-कादंबर लेखक, कवी आणि वाचनप्रेमी यांनी उपस्थित राहावे. तसेच् सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांनी १४ जूनपर्यंत केतकर कुल् महासभेचे कार्यवाह मुकुंद केतकर ९३७६७१०७५५, माजी अध्यक्ष संजय केतकर ९२२६४४६०७७ यांच्याशी संपर्क करून नावे नोंदवावीत, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
काव्य संमेलनात सहभागी होणाऱ्या कवींना देशभक्ती ज्ञानोपासना, समाजसेवा, स्त्री सन्मान, डॉ. केतकर यांच्य जीवन पटावरील कविता आणि तसेच इतर अनेक अर्थ क सामाजिक विषयांवर आपले विचार मांडता येणार आहेत.