
भारतीय कामगार सेनेचे संस्थापक अध्यक्ष, कामगार नेते व कामगार चळवळीचे प्रेरणास्थान कमांडर दत्ताजी साळवी यांची 108 वी जयंती सोमवार, 15 जून रोजी साजरी करण्यात येणार आहे. भारतीय कामगार सेनेच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून यावेळी त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात येणार आहे. तसेच त्यांच्या कार्याचा आणि कामगार चळवळीतील योगदानाचा गौरवही करण्यात येणार आहे.
कार्यक्रमात कमांडर दत्ताजी साळवी यांनी कामगारांच्या न्याय्य हक्कांसाठी दिलेल्या संघर्षाचे स्मरण करून त्यांच्या विचारांचा वारसा जतन करण्याचा संकल्प करण्यात येणार आहे. भारतीय कामगार सेनेचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, विविध उद्योगांतील कामगारांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे. भारतीय कामगार सेनेचे अध्यक्ष, शिवसेना नेते खासदार अरविंद सावंत यांच्या नेतृत्वाखाली प्रफुल्लबन सोसायटी, आर. के. वैद्य रोड, दादर पश्चिम येथील भारतीय कामगार सेना कार्यालयात सकाळी 10.30 वाजता या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती चिटणीस व कार्यालय प्रमुख विजय दळवी यांनी दिली.




























































