
शुक्रवारी शेअर बाजारात जबरदस्त उसळी पाहायला मिळाली. सर्व सेक्टरमध्ये सर्व सेक्टरमध्ये मोठय़ा प्रमाणात खरेदीदारी झाल्याने सेन्सेक्स 1695 अंकांनी वाढून 75,527 अंकांवर बंद झाला. तर निफ्टी 431 अंकांनी वाढून 23,622 अंकांवर बंद झाला. शेअर बाजाराप्रमाणे हिंदुस्थानी रुपयाही वाढला. डॉलरच्या तुलनेत रुपया 64 पैसे वाढून 95.11 प्रति डॉलरवर बंद झाला. शेअर बाजारात आज गुंतवणूकदारांना 10 लाख कोटी रुपयांचा फायदा झाला.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका विधानामुळे इराण-अमेरिका यांच्यातील युद्ध संपणार असल्याचे संकेत दिल्याने याचा थेट फायदा शेअर बाजाराला झाला. तसेच कच्च्या तेलाच्या किंमतीत घसरण झाल्यामुळेसुद्धा याचा फायदा हिंदुस्थानी शेअर बाजाराला झाला आहे. निफ्टीमध्ये श्रीराम फायनान्स, एल अँड टी, इंटरग्लोब एविएशन, बजाज फायनान्स आणि टायटन पंपनीचे सर्वात जास्त शेअर्सची विक्री झाली. तर दुसरीकडे नेस्ले इंडिया, ओएनजीसी, टेक महिंद्रा, टाटा पंज्युमर आणि एसबीआय लाइफ इन्शुरन्सचे शेअर्स सर्वात जास्त घसरले. सेक्टरच्या हिशेबाप्रमाणे पाहिल्यास सर्व इंडेक्स ग्रीन झोनमध्ये बंद झाले.
लिंकन फार्मास्युटिकल्सला 87.89 कोटींचा नफा
लिंकन फार्मास्युटिकल्स लि.ने 31 मार्च 2026 रोजी संपलेल्या आर्थिक वर्षासाठी 87.89 कोटी रुपयांचा एकत्रित निव्वळ नफा नोंदवला आहे. आर्थिक वर्ष 2025 मधील 82.35 कोटी रुपयांच्या निव्वळ नफ्याच्या तुलनेत, यात वार्षिक 6.74 टक्क्यांची वाढ दिसून आली. तर पंपनीने आर्थिक वर्ष 2026 मधील कामकाजातून 704.48 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळवले आहे. आर्थिक वर्ष 2025 मधील 645.71 कोटी रुपयांच्या उत्पन्नाच्या तुलनेत यात वार्षिक 9.10 टक्क्यांची वाढ झाली आहे. दरम्यान, पंपनीचा आर्थिक वर्ष 2026 साठी ईबीआयटीडीए 131.14 कोटी रुपये राहिला.
फ्रँकलिन इंडिया डिव्हिडंड यील्ड फंड
फ्रँकलिन टेम्पलटन म्युच्युअल फंडाद्वारे व्यवस्थापित केल्या जाणाऱया ‘फ्रँकलिन इंडिया डिव्हिडंड यील्ड फंड’ (पूर्वीचा टेम्पलटन इंडिया इक्विटी इन्कम फंड)ने गुंतवणूकदारांसाठी संपत्ती निर्मितीचे 20 वर्षे पूर्ण केले आहेत. त्याचबरोबर या फंडाच्या व्यवस्थापनाखालील एकूण मालमत्तेने 2,300 कोटी रुपयांचा टप्पाही ओलांडला आहे. प्रदीर्घ वाटचाल आणि भरभक्कम एयूएम असा यशाचा दुहेरी टप्पा या फंडाने गाठला आहे. लाभांश उत्पन्नावर आधारित समभागांत गुंतवणूक धोरणाचा हा फंड अवलंब करतो. या फंडाने मागील 15 वर्षांहून अधिक काळ निर्देशांकाच्या तुलनेत सरस कामगिरी बजावली आहे.
ऑटोडेस्कने ऑनलाइन स्टोअरचा विस्तार
ऑटोडेस्कने आपल्या स्टोअरचे संपूर्ण स्वयं-सेवा प्रोक्योरमेंट व्यासपीठात रूपांतर केल्याची घोषणा केली आहे. या माध्यमातून स्टार्टअप्स, उद्योजक, स्वतंत्र व्यावसायिक तसेच लघु व मध्यम उद्योगांना व्यावसायिक डिझाइन आणि निर्मिती तंत्रज्ञान अधिक सुलभपणे उपलब्ध होणार आहे. पंपनीच्या निवेदनानुसार, या बदलामुळे ग्राहकांना ऑटोडेस्कची उत्पादने शोधणे सुलभ होईल.
‘हॉरिझॉन रिक्लेम’चा आयपीओ आला
हॉरिझॉन रिक्लेम (इंडिया) लिमिटेडने आपल्या प्रारंभिक समभाग विक्रीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. बीएसई एसएमई प्लॅटफॉर्मवर येणाऱया या आयपीओद्वारे पंपनी सुमारे 54.27 कोटी रुपये भांडवल उभारणार आहे. पंपनीने प्रति शेअर 98 ते 103 रुपये असा प्राइस बँड निश्चित केला आहे. सर्वसामान्य गुंतवणूकदारांसाठी हा आयपीओ 12 जून ते 16 जून 2026 पर्यंत खुला असेल.
पिजनची ग्राहकांसाठी नवी ऑफर
पिजन ब्रँडची निर्माता पंपनी स्टोवक्राफ्ट लिमिटेडने आपली नवीन एक्सचेंज ऑफर लॉन्च केली आहे. या ऑफरअंतर्गत ग्राहक कोणत्याही ब्रँडचे जुने कुकवेअर आणि किचन अप्लायन्सेस, त्यांची स्थिती कशीही असो, एक्सचेंज करू शकतात आणि त्या बदल्यात पिजनच्या मॉडर्न प्रॉडक्ट्सच्या विस्तृत श्रेणीवर 50 टक्क्यांपर्यंत आकर्षक सूट मिळवू शकतात.
सात्विक ग्रीन एनर्जी
सोलर पीव्ही मॉडय़ुल पंपन्यांपैकी एक सात्विक ग्रीन एनर्जी पंपनीला टॉप 25 ग्लोबल सोलर पीव्ही मॉडय़ुल मॅन्युफॅक्चरिंगमध्ये स्थान मिळाले. या सोलर पीव्ही मॉडय़ुल निर्माता पंपन्यांमध्ये सात्विकला चौथे स्थान मिळाले आहे.
एसुस सर्व्हिस सेंटर
तैवानची अग्रगण्य तंत्रज्ञान पंपनी एसुस इंडियाने आज मुंबईत एका नवीन एसुस एक्सक्लुझिव्ह सर्व्हिस सेंटरच्या उद्घाटनाची घोषणा केली. यावेळी सुस इंडियाचे राष्ट्रीय सेवा व्यवस्थापक, विशाल म्हाळसेकर यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
स्ट्रीक्स प्रोफेशनल
स्ट्रीक्स प्रोफेशनल या सलून-विशेष हेअर कलर आणि केअर ब्रँडने ब्रूलेट 2026 चे अनावरण केले आहे. हे ट्रेंडवर आधारित कलेक्शन आहे, जे लक्झरी, कारागिरी आणि अत्याधुनिकतेच्या दृष्टिकोनातून ब्रुनेट रंगाला नवीन रूप देते.
फुजीफिल्म मॅमोग्राफी
फुजीफिल्मने एनएम मेडिकलमध्ये नवीन एआय-सक्षम डिजिटल मॅमोग्राफी प्रणाली ‘अम्युलेट सोफिनिटी’ आणली. कार्यक्षमता आणि पोझिशनिंगची अचूकता आणखी सुधारण्यासाठी या प्रणालीमध्ये एआयचा समावेश आहे.





























































