
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची नात, खासदार सुप्रिया सुळे यांची सुकन्या चि. सौ. कां. रेवती सुळे आणि भाजप आमदार उद्योगपती अरुण लखानी यांचा चिरंजीव सारंग यांचा शाही विवाह सोहळा आज मुंबईमध्ये मोठय़ा थाटामाटात आणि मंगलमय वातावरणात पार पडला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह देशाचे गृहमंत्री अमित शहा, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यासह उद्योग, कला, क्रीडा, सांस्कृतिक आणि राजकीय क्षेत्रातील दिग्गजांनी या लग्न सोहळ्याला उपस्थित राहून वधू-वरांना शुभाशीर्वाद दिले.
जिओ सेंटरमध्ये पार पडलेल्या या विवाह सोहळय़ाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सरसंघचालक मोहन भागवत, अमिताभ बच्चन, काँग्रेस राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, शिवसेना नेते खासदार संजय राऊत, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, उद्योजक मुकेश-नीता अंबानी, गौतम अदानी आदी उपस्थित होते.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांची कन्या रेवती सुळे आणि सारंग लखानी यांचा विवाह सोहळा शनिवारी मुंबईत थाटामाटात पार पडला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व सौ. रश्मी ठाकरे यांनी या सोहळ्यास उपस्थित राहून वधुवरांस शुभाशीर्वाद दिले. शिवसेना नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे हेही यावेळी उपस्थित होते.



























































