जेवणात तिखट जास्त पडले… हे करून पहा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कधी आपल्या हातून जेवणात तिखट (मसाला) जास्त पडतो. तिखट कमी करण्याचा सर्वात सोपा उपाय म्हणजे त्या पदार्थाचे प्रमाण वाढवणे. आमटी जास्त तिखट झाली असेल तर त्यात आणखी थोडी डाळ आणि पाणी घाला.

लिंबाचा रस, व्हिनेगर किंवा टोमॅटो यांसारख्या पदार्थांमुळे तिखटपणा कमी होतो. दही, दूध किंवा क्रीमचाही वापर करू शकता. काही पदार्थांमध्ये अगदी थोडी साखर किंवा थोडे गूळ  वापरल्याने तिखटपणा कमी होतो.